गडचिरोलीविदर्भ

शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही – व्यापाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय

भामरागडमध्ये त्रिवेनी असोसिएशन आणि मुक्तिपथच्या बैठकीत ठराव; ‘कॅन्सरमुक्त पिढी‘ घडविण्यासाठी पुढाकार

गडचिरोली : भामरागड शहरात त्रिवेनी असोसिएशन (व्यापारी संघटना) आणि मुक्तिपथ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका लक्षात घेता, व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १८ वर्षांखालील मुलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांना कॅन्सरपासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे आणि तंबाखूजन्य पदार्थ विकून आपणच नवीन पिढीला मृत्यूच्या वाटेवर ढकलत आहोत. त्यांनी किराणा दुकानात सुगंधित तंबाखूची विक्री करणे गुन्हा असून परवाना रद्द होऊ शकतो, यासह अनेक कायद्यांची माहिती दिली.

या बैठकीत व्यापारी संघटनेने १८ वर्षाखालील मुलांना खर्रा/तंबाखू विक्री करणार नाही. ‘तंबाखू विक्री केली जात नाही’ आणि ‘आपल्या मुलांना कॅन्सरपासून वाचवूया’ असे पोस्टर दुकानात लावून जनजागृती करण्याची तयारी दर्शवली. शासकीय कार्यालयापासून १०० यार्ड परिसरात सुगंधित तंबाखूची विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला. लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास बाल स्वसंरक्षण कायदा २०१५ च्या अधिनियमानुसार ७ वर्षांची सजा व एक लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. या कायद्याचे उल्लंघन करून लहान मुलांना विक्री केल्यास, संबंधित दुकानदाराला व्यापारी संघटना पाठबळ देणार नाही, असेही यावेळी ठरविण्यात आले.

सुदृढ पिढी घडविण्यासाठी आणि कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंदी करणे महत्त्वाचे आहे, यावर या बैठकीत एकमत झाले. बैठकीला त्रिवेनी असोसिएशनचे उपाध्यक्ष महीरा कोंकमुटीवार, सलीम बाबु शेख, संतोष मुदेवार, लक्ष्मण नुकावार, सुभाष बाला, दिणेश गटारे,सुरेश पदा, किशोर भांडेकर, संदीप समदर, रोहीत बोल्लमपल्लीवार, राजेश कोठारे, शंकर बडगे विष्णू स्वर्णवार, संदीप मोगरे, अबिद शेख, तसेच मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button