गडचिरोलीविदर्भ

रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या घरासह धानाचे नुकसान ; खा. डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

दुर्गम भागातील पीडित शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याचे निर्देश

गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम पोटेगाव अंतर्गत ताडगुडा गावात रानटी हत्तीने धुमाकूळ घालत शेतकरी माधव कोराम यांच्या घराचे व धानाचे मोठे नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान आणि काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली.

ताडगुडा गावात पोहोचण्यासाठी रस्त्यांचा अभाव असतानाही खासदार डॉ. किरसान यांनी घनदाट जंगलातून दुचाकीवरून प्रवास करून पीडित कुटुंबाची भेट घेतली. हे गाव पूर्णपणे जंगलाने वेढलेले असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. खासदार किरसान यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत, तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच, वन्यप्राण्यांचा वाढता त्रास लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी नरेंद्र पोटावी, संदीप पोटावी, मनोहर पोटावी, शिवाजी नरोटे, दिवाकर निसार, प्रवीण हिचामी, गरिमा कोराम, दिवाकर तुमरेटी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश विधाते, गौरव येणप्रेड्डीवार आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button