गडचिरोलीगोंदियाचंद्रपूरनागपूरभंडाराविदर्भ

नागपूर परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धेत गडचिरोली, चंद्रपूरची बाजी

नागपूर ग्रामीण पोलिसांचे उत्कृष्ट प्रदर्शन  

गोंदिया : पोलिस मुख्यालय कारंजा गोंदिया, इंदिरा गांधी स्टेडियम, आणि क्रीडा संकुल गोंदिया येथील मैदानावर सुरू करण्यात आल्या. या स्पर्धात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, वर्धा अशा ६ जिल्ह्यातील संघांनी भाग घेतला आहे.

नागपूर परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ ऍथलेटिक्स (पुरुष/महिला) अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात पुरुष १० हजार मीटर धावणे यात प्रथम लिलाधर खरबनकर गडचिरोली, द्वितीय सत्यपाल घरत गोंदिया, तृतीय एस.एस. पवार गोंदिया, १० हजार मीटर धावणे महिला यात प्रथम विराजकण्या कोडापे भंडारा, द्वितीय प्रियंका हुलके गडचिरोली, तृतीय पायल प्रधान गोंदिया, ४०० मीटर धावणे पुरुष यात नाजूक मोहुर्ले गडचिरोली प्रथम, गजानन कोडापे गडचिरोली व्दितीय, परमेश्वर मुरकुटे नागपूर ग्रामीण तृतीय, ४०० मीटर धावणे महिला यात प्रणाली रनदाई नागपूर ग्रामीण प्रथम, हर्षा रोगे चंद्रपूर द्वितीय, मयुरी ठाकरे गडचिरोली तृतीय, उंच उडी पुरुष प्रथम भाविक टेकाम चंद्रपूर, द्वितीय मुखरु कोटरंगे गडचिरोली, तृतीय कमलेश शेंडे भंडारा, उंच उडी महिला ग्यानीता धांडे भंडारा प्रथम, रिंकी यादव गडचिरोली द्वितीय, नेहा पठाण गडचिरोली तृतीय, थाली फेक पुरुष पंकज बेले चंद्रपूर प्रथम, सौरभ गेडाम वर्धा द्वितीय, सुरज जाधव वर्धा तृतीय, थाळी फेक महिला करिश्मा रागित चंद्रपूर प्रथम, सुनीता बर्षा गडचिरोली व्दितीय, रोशनी घिव्हे चंद्रपूर तृतीय, २०० मीटर धावणे पुरुष यात प्रथम अमित मस्करे नागपूर ग्रामीण, द्वितीय पंकज परतेती नागपूर ग्रामीण, तृतीय राम सुनकेवार गडचिरोली, २०० मीटर धावणे (महिला) यात प्रथम प्रणाली रनदाई नागपूर ग्रामीण द्वितीय सेजल चुटे गोंदिया, तृतीय पुष्पा बोरकर, भंडारा, तिहेरी उडी पुरुष देविदास पोटावी गडचिरोली प्रथम, वैभव लाटे नागपूर ग्रामीण द्वितीय, नितल भोयर भंडारा तृतीय, तिहेरी उंडी महिला यात रिया सोनुरले चंद्रपूर प्रथम, शीतल अर्के चंद्रपूर द्वितीय, शीतल मेकलवार गडचिरोली तृतीय क्रमांक मिळविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button