गडचिरोलीविदर्भ

माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी घेतली स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट

विविध विषयांवर केली चर्चा

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी चामोर्शी तालुक्यात स्वाभिमानी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा व सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

या भेटीत अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांची पडझड, पूरग्रस्त क्षेत्रात वाहतूक ठप्प होणे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यासारख्या गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वांगाने प्रयत्न करणार असल्याच्या शब्द उपस्थित सर्व संघटनेचे सदस्य व गाव भेटी दरम्यान डॉ. उसेंडी यांनी दिला.

यावेळी दिवाकर कोहळे, रमेश येडलावर, अरुण गव्हारे, आशिष पिपरे, रमेश अधिकारी, माणिक कोहळे, रामेश्र्वर मेश्राम, राजु धोडरे, यशवंतजी त्रिकांदे, विनोद किरमे, विनोदजी खोबे, गणेश मडावी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button