नागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या – सलील देशमुख यांची मागणी

नागपूर : छत्तीसगड राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काटोल मतदारसंघातील पराभूत उमेदवार सलील देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला निवेदनही सादर केले.

सलील देशमुख म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच अनेक जण ईव्हीएमच्या विरोधात कोर्टातही गेले आहेत. यामुळे मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही मागणी राजकीय पक्षासोबत आता सामान्य नागरिक करीत असून अनेक ग्रामपंचायतींनी तसे ठरावही घेतले आहेत. नुकत्याच छत्तीसगड येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका छत्तीसगड राज्य निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर घेतल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी देशमुख यांनी केली. पत्रपरिषदेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील आणि शैलेंद्र तिवारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button