क्राईमगडचिरोलीविदर्भ

रिक्षातून दारूची वाहतूक ; दोघे जेरबंद

आरमोरी : ऑटो रिक्षातून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई १४ ऑक्टोबरला करण्यात आली. विजय देवकर (रा. राजा चौक, आरमोरी) व उत्तम लोणारे (रा. नेहरू चौक, आरमोरी) अशी आरोपींची नावे आहेत.

आशू मेश्राम (रा. बर्डी, आरमोरी) हा फरार आहे. हे तिघे रिक्षातून (एमएच ३३ व्ही- २४४४) दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यावरून शहरातील शक्ती नगरात पोलिसांनी सापळा लावला. रिक्षा येताच तपासणी केली असता दोन पिशव्यांत १० हजार ८५० रुपयांची देशी दारू आढळून आली. दारूसह रिक्षा असा एकूण ९० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोनि. कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्योती राक्षे तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button