गडचिरोलीविदर्भ

न.प.चे स्वच्छता व आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा अपघाती मृत्यू

कारगिल चौक परिसरात डुक्कर आडवे आल्याने दुचाकी अनियंत्रित

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले आणि गडचिरोली नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून दिड महिन्यापूर्वीच पदभार घेणारे मुक्तेश्वर काटवे यांचा शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. कारगिल चौक परिसरात डुक्कर आडवे आल्याने त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, मुक्तेश्वर काटवे हे काल रात्री डॉ. देवराव होळी यांची भाजप आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त आयोजित स्वागत कार्यक्रमात उपस्थित होते. तेथून दुचाकीने घराकडे जात असताना कारगिल चौक परिसरात दुचाकी घसरून पडल्याने डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे दुर्धर आजाराने निधन झाले होते.

काटवे यांच्या पार्थिवावर आज २८ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान शहरातील मोकाट डुकरांच्या सुळसुळाटाबद्दल संताप व्यक्त केला जात असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button