
ग्रामविकासाला गती देण्यासाठी पंचायत राज सक्षम करण्यावर भर
देसाईगंज : ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, पंचायत समिती देसाईगंज यांच्या वतीने नगरपरिषद देसाईगंज येथे ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे सहउद्घाटन म्हणून माजी आ. कृष्णा गजबे उपस्थित होते. कार्यक्रमास आ. रामदास मसराम, माजी उपसभापती गोपाल उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पेंदाम, तहसीलदार डुडूलकर, नितीन राऊत, सरपंच अपर्णा राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद ठीकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी आ. गजबे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामुळे गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल.” त्यांनी ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत पंचायत राजच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यशाळेत पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व, ग्रामीण विकासासाठीचे उपाय, शासनाच्या विविध योजना आणि त्यात जनसहभागाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या गावाच्या विकासासाठी आवश्यक माहिती मिळाली.



