गोंदियाविदर्भ

असंघटीत कामगारांनी नोंदणी करुन विविध योजनांचा लाभ घ्यावा – भैय्यासाहेब बेहेरे

गोंदिया : केंद्र शासनाने असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर 2008 रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम-2008 पारीत केलेला असून त्या अनुषंगाने विविध व्यवसाय जसे- मनरेगा कामगार, बिडी कामगार, लघु व सिमांत शेतकरी व भूमीहीन शेतमजूर, बांधकाम कामगार, मच्छीमार, वृत्तपत्र विक्रते, घरेलु कामगार, चर्मकार, सफाई कर्मचारी, विटभट्टी कमगार, आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले, भाजी व फळे विक्रेते व तत्सम काम करणारे विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याचा उद्देश असून असंघटीत क्षेत्रात काम करीत असलेल्या कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी याकरीता शासनाच्या विविध शासकीय विभागाने समन्वयाने काम करावे व कामगार संघटनेने यासाठी सहकार्य करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या असंघटीत कामगारांच्या नोंदणी व योजनांबाबत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या सभेत बेहेरे बोलत होते. सभेला सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सारंग पटले, भारतीय जीवन बीमा निगमचे प्रशासकीय अधिकारी दिनेश वानखेडे, महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी मुकेश पटले, केटीएस रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी. जायस्वाल, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डी.बी. दिघोरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी लघुटंकलेखक लक्ष्मण खेडकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button