गोंदियामुख्य बातमीविदर्भ

पुराच्या पाण्यात अडकले शेतावर गेलेले दोघे बाप-लेक

सडक अर्जुनी तालुक्यातील पिपरी येथील घटना

गोंदिया : जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळ ते मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पिपरी येथील चुलबंद नदी दुथळी भरून वाहत आहे. दरम्यान पिपरी येथील शेतकरी रवींद्र पुंडे व त्यांचा मुलगा अजय पुंडे हे दोघेही बापलेक सकाळच्या सुमारास शेतात गेले होते. अचानक पावसाने शेताला वेढा घातला असून ते दोघेही बापलेक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांनी एका झाडाचा सहारा घेतला असून फोनवरून याची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनास्थळी गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक पोहोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button