गडचिरोलीविदर्भ

धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देऊ नका

आ. डॉ. देवराव होळी यांचे महामहीम राज्यपालांना निवेदन

गडचिरोली : ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या वतीने  आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनावर दबाव टाकून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु राज्यातील महायुतीचे सरकार अनुसूचित जमाती मधून धनगर समाजाला आरक्षण देणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. परंतु तरीही यतकदाचित तसा निर्णय झाल्यास आदिवासी समाजाची मोठी नाराजी सहन करावी लागेल. त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन देऊन केली.

धनगर समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून करण्यात आलेला अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशीही विनंती केली. मात्र आदिवासींमधून आरक्षण देण्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना आदिवासीं नेतृत्वाला व आमदारांना विश्वासात घ्यावे अशी मागणी करीत कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी विनंती या भेटी प्रसंगी आमदार डॉ. होळी यांनी राज्यपालांना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button