गडचिरोलीविदर्भ

मी उमेदवारी मागतोय शेतकरी, मजूर, बेरोजगारांना न्याय देण्यासाठी – माधवराव गावळ

आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, मजूर, महिला आणि बेरोजगारांना संवैधानिक मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे माधवराव गावळ यांनी सांगितले.

उपविभागीय अभियंता पदावरुन निवृत्त झाल्यानंतर माधवराव गावळ यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी मतदारसंघातील प्रश्न आणि त्यावरील उपाय यावर प्रकाश टाकला. मी अधिकारी असताना या क्षेत्रात काम केलं आहे. हे क्षेत्र उद्योगविरहीत भाग आहे. सर्व समाज शेतीवर अवलंबून आहे. शेतीला वीज आणि पाणी उपलब्ध करुन दिल्यास त्यांना दरमहा १० हजार रुपये मिळतील, यासाठी उपाययोजना करण्याचा मानस आहे.

कुरखेडा, देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात मिनी एमआयडीसी मंजूर आहेत. परंतु लहान-लहान अडचणींमुळे लघुउद्योजक उद्योग उभारण्यास धजावत नाही. मजबूत लोकप्रतिनिधी असल्यास उद्योग सुरु होतील. १३२ केव्हीचे सबस्टेशन उभारले असते तर भारनियमनाचा प्रश्न निर्माण झाला नसता. प्रत्येक गावात शासनाने अडीच एकर जागा घेऊन त्यावर सोलर प्लाँट उभा करुन १० किलोवॅटची उर्जा निर्माण केली तर घरगुती आणि शेतीलाही वीज मिळू शकते.

यंदा गडचिरोलीत २२०० मिलिमीटर पाऊस पडला. परंतु ते पाणी साठविण्याची पद्धत प्रभावी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सहभागी करुन सिरिजमध्ये बंधारे बांधल्यास सिंचनासाठी मोठा लाभ होऊ शकतो. क्लस्टर करुन भाजीपाला पिकवून ते एका ठिकाणी गोळा ठेवून चांगल्याप्रकारे मार्केटिंग केल्यास नागरिकांना पैसा मिळू शकतो. युवकांचे १०-१० चे गट तयार करुन त्यांना पोल्ट्री फॉर्म दिल्यास बेरोजगारांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यावर माझे काम सुरु आहे, असं गावळ म्हणाले.

काँग्रेस हा स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या काळातच इनफ्रास्ट्रक्चर सुरु झाला. डिजिटल इंडियाची संकल्पना राजीव गांधी यांचीच आहे. आधार कार्डवर युती शासनाने टिका केली होती. परंतु आज आधार कार्ड किती महत्वाचा आहे, हे त्यांनाही कळले आहे. मनरेगा कायदा काँग्रेसनेच निर्माण केला, त्यामुळेच मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, असे गावळ म्हणाले.

सन २००० पासून मी कर्मचारी युनियनमध्ये काम करतो. आदिवासींमधील आठही संवर्गातील नागरिकांना एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे मला निवडणुकीत अडचण जाणार नाही, असंही गावळ यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button