गडचिरोलीविदर्भ

आदर्श पदवी महाविद्यालयात विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा

गडचिरोली : महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी पालकांचे सहभाग करून घेऊन विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यात संपर्क घडवून आणण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे घटक असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालयात विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन विद्यापिठाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून सल्लागार समिती सदस्य डॉ. संजय गोरे, प्राचार्य (प्र) डॉ. कृष्णा कारू, आनंद सारडा, मनीष तिवारी व समन्वयक  भरत घेर हे प्रामुखाने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य (प्र) डॉ. कृष्णा कारु यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थित सर्व मान्यवर व पालकांना महाविद्यालयाच्या सद्यस्थितीतील वाटचालीबाबत भाष्य केले आणि महाविद्यालय सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमाची माहिती देऊन विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा आयोजना मागचे महत्त्व सांगताना म्हणाले की, मुलं शिक्षणासाठी बाहेर जाऊन कशाप्रकारे शिक्षण घेत आहे तसेच महाविद्यालयात आपल्या मुलांची स्थिती काय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे शिक्षण दिले जाते काय याची माहिती पालकांना  असायला पाहिजे. सोबतच पालक व शिक्षक यांच्यात समन्वयासाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा महत्वाचे असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबध्द असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी जिल्ह्यातील युवकांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन रोजगाराभिमुख करण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना झाली असल्याचे सांगून स्थापने पासून आतापर्यंत महाविद्यालयाच्या वाटचाली बाबत माहिती देऊन आपले महाविद्यालय महाराष्ट्रात एक सर्वोत्कृष्ट महाविद्यालय असल्याचे मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना या महाविद्यालया मार्फत मोफत स्वरूपात शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांनी याच्या फायदा घेऊन चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन स्वतः मध्ये बदल घडवून आणावे आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक प्रकारचे सोशल मीडिया पुढे आले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या वापर चांगल्या कामासाठी करून घ्यावे. आणि सोशल मीडियामुळे जग जवळ येऊन पोहोचले आहे जगातील अनेक गोष्टींची माहिती एका क्षणात आपल्याला माहीत होत असून विद्यार्थांनी त्याच्या वापर चांगल्यासाठी करून घेऊन स्वतःला आद्यावत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देऊन शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये परिवर्तन होत असून शिक्षणात व्यक्ती व समाजात बदल घडवून आणण्याची खूप मोठी शक्ती आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून योग्य वयात योग्य प्रकारचे शिक्षण घेणे अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले.

प्रमुख अतिथी डॉ. संजय गोरे आपल्या भाषणात म्हणाले की, सदर महाविद्यालयाची स्थापना विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी झाली असून आजच्या काळातील विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणा सोबतच कौशल्य पूर्ण शिक्षणाची गरज आहे, घेतलेला शिक्षण कधी वाया जात नसून आयुष्यात त्याच उपयोग कुठं न कुठ होत असते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत काही न काही शिकत असायला पाहिजे यासाठी शिक्षकांसोबत पालकांची पण मोठी जबाबदारी असून आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.

मनीष तिवारी उपस्थित विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना म्हणाले की, या भागातील विद्यार्थी खूप कष्टाळू आणि मेहनती असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगून शिक्षणानंतर भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने संबंधित अभ्यासक्रमाची पुरेपूर माहिती, प्रॅक्टिकल ज्ञान तसेच संवाद कौशल्य महत्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना काय शिकविले जातात आणि कशा प्रकारे शिकविले जातात या विषयी संपूर्ण माहिती महाविद्यालयातील सहा. प्राध्यापकांनी उपस्थित मान्यवर व पालकांना दिली आणि याप्रसंगी पालक-विद्यार्थी-शिक्षक यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य (प्र) डॉ. कृष्णा कारु यांनी केले. संचालन सहा. प्राध्यापक प्रिती भांडेकर आणि सहा. प्राध्यापक राजश्री परीहार यांनी केले. तर आभार समन्वयक भरत घेर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व सहा. प्राध्यापक वृंद, सह-समन्वयक, ग्रंथालय सहाय्यक आणि इतर कर्मचारी यांनी सहकार्य कार्य केले. यावेळी पालक वर्ग आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button