गडचिरोलीविदर्भ

महात्मा गांधी महाविद्यालयातील गायत्री चौके ने गाजविले गोंडवाना विद्यापीठ

अनुसूचित जमाती प्रवर्गातुन सुवर्णपदकाची मानकरी

आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथील कला शाखेतील पदवीधर गायत्री चौके या विद्यार्थिनीने सत्र 2022-23 मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावून मंजुळाबाई साधुजी होळी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. यासोबतच कला शाखा पदवी परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये विद्यापीठामध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या बाराव्या दीक्षांत समारंभात महामहीम राज्यपाल व कुलपती महाराष्ट्र राज्य डॉ. सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते गायत्रीला सुवर्ण पदक व पदवी प्रमाणपत्र प्रदान करून तिचा गौरव करण्यात आला.

तिच्या या यशाबद्दल मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी गायत्रीचे कौतुक व अभिनंदन केले. भविष्यात अशाच प्रकारे यशामध्ये सातत्य ठेवावे असे आवाहन केले.

गायत्रीने आपल्या या यशाचे श्रेय संस्था सचिव मनोज वनमाळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, आईवडील व गुरुजन यांना दिले. याशिवाय महात्मा गांधी महाविद्यालय आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरेल असे म्हणुन गायत्रीने महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button