अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांनी दाखल केले नामांकन

नामांकन रॅलीला अपार जनसमर्थन
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी समर्थित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांनी आपले नामांकन दाखल केले. इंडियन फंक्शन हॉल, भुजंगरावपेठा, अहेरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित रॅलीला मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाने प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये अहेरीतील नागरिकांनी भाग्यश्री आत्राम यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्यांना प्रचंड आशीर्वाद दिला.

भाग्यश्री आत्राम यांनी या अद्भुत प्रेमासाठी आणि मिळालेल्या समर्थनासाठी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अहेरी समृद्धी, विकास, आणि आनंदाच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. या बदलाच्या नव्या विचारांना त्यांनी सलाम केला आहे.



