
देसाईगंज : भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आर.पी.आय (आ) महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णा गजबे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक अशोक नेते यांनी देसाईगंज (वडसा) येथे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णा गजबे यांचे पुष्पगुच्छाने स्वागत व विजयी भव असे अभिनंदन केले.
यावेळी जेष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, अनुजाती (दलित) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऍड. उमेश वालदे, तालुकाध्यक्ष नसीरुद्दीन भामानी, गजभिये, मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ग्यानेंद्र बिश्वास, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, प्रमोद झिलपे, विकास पायडलवार, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



