छत्तीसगडमुख्य बातमी

एका महिला नक्षलवाद्यासह पाच नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

बिजापूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात 5 लाखांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवाद्यासह पाच नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गडचिरोली विभागातील अहेरी एरिया कमिटी सदस्य (ACM) सुशीला उर्फ ​​बुज्जीने सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. तिच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते.

तसेच जिल्ह्यातील अन्य चार नक्षलवादी सुखराम मोदीयम, सुद्दू कोरसा, लक्खू फारसा आणि सन्नू मडवी यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. माओवाद्यांचे भेदभावपूर्ण धोरण, दुर्लक्ष आणि विचारसरणीमुळे संतप्त होऊन आणि राज्य सरकारच्या ‘नियाद नेला नार’ (तुमचे चांगले गाव) योजनेमुळे प्रभावित होऊन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर पोलीस दलावर हल्ला, खून, सरकारी मालमत्तेचे नुकसान यासह इतर अनेक नक्षलवादी घटनांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकी 25,000 रुपये रोख देण्यात आले आहेत.

2024 मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 185 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून विविध माओवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या 411 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button