
मुक्तीपथ तालुका स्तरीय बैठकीत तहसीलदारांच्या सूचना
गडचिरोली : एटापल्ली तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुका स्तरीय बैठक तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मागील बैठकीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यासह महिलांना खर्ऱ्याच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी शक्तीपथ बैठकीत वाढ करण्यासह व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या.
एटापल्ली तालुक्यातील सर्व कार्यालय तंबाखुमुक्त करणे, तालुका स्तरावर अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करण्यासाठी पथक नेमून कृती करणे, महिलांना खर्ऱ्याचे व्यसनातून मुक्त करण्यासाठी शक्तीपथ बैठकी जास्तीत घ्यावे. तुमरगुंडा येथील महाशिवरात्री यात्रा सर्व विभाग मिळून दारू व तंबाखूमुक्त करा असा आदेश सर्व विभागाचे अधिकारी यांना देण्यात आले. तसेच तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा. आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
बैठकीत तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, तालुका कृषि अधिकारी अरुण वसवाडे, एपीआय कैलास बेले, सुधाकर श्रीरामे, लिपीक एल.टी. दुर्गे नप एटापल्ली, मुक्तिपथ कार्यकर्ता रवींद्र वैरागडे , स्पार्क कार्यकर्ती तेजस्विनी हेमके उपस्थित होते.



