
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तळोधी, कुनघाडा, पावीलसनपेठ रस्त्यावर पूल बांधकामाचे भूमिपूजन
चामोर्शी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तळोधी, कुनघाडा, पाविलासनपेठ रस्त्यावर भव्य पूल बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील तमाम शेवटच्या जंगलव्याप्त व अतिदुर्गम भागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. किरसान यांनी याप्रसंगी केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस नेते मनोहर पोरेटी, सतिश विधाते, अनिल कोठारे, वसंत राऊत, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, सुनील चडगुलवार, विपुल येलेट्टीवार, गौरव येलेट्टीवार, सरपंच सौ. मेश्राम, संबंधित विभागाचे अभियंता व तळोधी, कुनघाडा पावीलसनपेठ भागातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



