गडचिरोलीविदर्भ

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल १४ व १५ ऑगस्टला गडचिरोलीच्या दौऱ्यावर

विविध कार्यक्रमांना उपस्थिती ; विकासकामांचा आढावा घेणार

गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. १४ व १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.

१४ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वा.: कृषी चिकित्सालय, सोनापूर, येथे आयोजित जिल्हास्तरीय ‘रानभाजी महोत्सव-२०२५’ कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी २.३० वा.: नगर परिषद, गडचिरोली येथे इंटरएक्टिव्ह पॅनलच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती. दुपारी ३.०० वा.: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची सभा. सायं. ६.०० वा.: जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद. सायं. ६.३० वा.: शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा.: जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. व सोयीनुसार रामटेककडे प्रयाण.

या दौऱ्यात सहपालकमंत्री जयस्वाल जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणार असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button