क्राईमचंद्रपूरमुख्य बातमीविदर्भ

अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार ; महिलेला अटक, मुलीची सुटका

गौतम नगरात शहर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी १३ मे रोजी गौतम नगर परिसरात एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे. ही महिला एका अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने धाड टाकून पीडित मुलीची सुटका केली.

अमीना सैय्यद (रा. महाकाली वार्ड, गौतम नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती गौतम नगरात एका अल्पवयीन मुलीकडून अनैतिक कृत्य करवून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शहर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आणि अमीना सैय्यदला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी अमीना सैयद हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ (४) सहकलम ३, ४, ५, ६ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप, महिला पोलीस हवालदार भावना रामटेके, पोलीस हवालदार सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय घोटे, नायक पोलीस अंमलदार कपुरचंद खैरवार, पोलीस अंमलदार इमरान खान, इरशाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, महिला पोलीस अंमलदार सारीका गौरकार आणि दिपीका झिंगरे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button