
पालकमंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे “जिल्हा नियोजन समितीची” महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचे वाढते हल्ले कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. त्याचबरोबर, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी केली.
या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगडे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



