गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचे राज्यात नेतृत्व; ५६१६ ग्राहकांनी घेतला सौर ऊर्जेचा लाभ

वीज बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनात चंद्रपूरकरांचा मोठा वाटा; महावितरणचे योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर : प्रधानमंत्री ‘सूर्यघर’ – मोफत वीज योजना चंद्रपूर जिल्ह्यात वेगाने आकार घेत असून, सौर ऊर्जा निर्मितीच्या अंमलबजावणीत चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात अक्षरशः नेतृत्व स्वीकारले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६१६ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, सौर ऊर्जा निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.

चंद्रपूरच्या या यशामागे नागरिकांचा वाढता सहभाग, स्थानिक प्रशासनाचे प्रभावी नियोजन आणि योजनेच्या लाभांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कारणीभूत आहेत. यामुळे केवळ विजेच्या खर्चात बचतच होत नाही, तर पर्यावरणाची देखील काळजी घेतली जात आहे. प्रधानमंत्री ‘सूर्य घर’ योजनेमुळे चंद्रपूरकर आता खऱ्या अर्थाने ‘सूर्यशक्ती’चा अनुभव घेत आहेत आणि हरित भविष्याच्या दिशेने एक नवा अध्याय लिहित आहेत.

भविष्यातही चंद्रपूर जिल्हा याच वेगाने सौर ऊर्जा क्षेत्रात प्रगती करेल आणि देशाला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यात सिंहाचा वाटा उचलेल अशी अपेक्षा आहे. आपणही या अभियानाचा भाग होऊन आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच स्थापित करून वीज बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकता. अधिक माहितीसाठी आजच महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/index.php या संकेतस्थळाला किंवा नजिकच्या कार्यालयाशी अथवा केंद्र शासनाच्या https://pmsuryaghar.gov.in/#/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि या पर्यावरण संवर्धनाच्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन चंद्रपूर महावितरणने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button