गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरू; ८ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया

लॉयड्स मेटल्सचे सहकार्य, भारत सरकार व राज्य शासनाची मान्यता

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन परिसरामध्ये लॉईड्स मेटल्स कंपनीच्या सहकार्याने आणि भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यतेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (University Institute of Technology) सुरू करण्यात आली आहे. या संस्थेद्वारे ३ वर्षांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पहिल्या फेरी अंतर्गत, ८ जुलै ते १० जुलै २०२५ या कालावधीत दहावी उत्तीर्ण आणि DTE पोर्टलद्वारे नोंदणीकृत विद्यार्थी प्रवेशासाठी आपले पर्याय (Option Form) भरू शकतील. विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेद्वारे देऊ केलेल्या अभ्यासक्रमांचे संकेतांक (Codes)  (१) मायनिंग इंजिनीअरिंग (Mining Engineering) – ४०२६७०११०U, (२) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (Computer Science and Engineering) – ४०२६२४२१०U, (३) मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी (Manufacturing Technology) – ४०२६६३०१०U (४) मेटलर्जिकल इंजिनीअरिंग (Metallurgical Engineering) – ४०२६६९२१०U आहेत.

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी आपले पर्याय भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्याय भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थी मदत केंद्र (Student Help Center) स्थापित करण्यात आले आहे. या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. मनीष उत्तरवार, प्रभारी संचालक, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था व संचालक न. न. व सां., गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली (भ्रमणध्वनी क्रमांक: ९८२२४६९६०९) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button