
२२ ते २९ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन ; ‘स्वच्छता पंधरवड्या’त विद्यार्थ्यांचा सहभाग
अहेरी : श्री शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय, अहेरी येथे महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या परिपत्रकानुसार ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) स्थापना दिनानिमित्त २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यासोबतच १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता अभियान पंधरवडा देखील उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष सप्ताहाची सुरुवात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाच्या स्मरणार्थ करण्यात आली. याशिवाय, विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांचा सत्कार व व्याख्यान आयोजित करण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय नायकांचे स्मरण, पर्यावरण आणि समाजसेवेवर भर देण्यात आला.
23 सप्टेंबरला भारतरत्न सरदार पटेल यांची भारतीय अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याची व कणखर नेतृत्वाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 24 सप्टेंबरला राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिनानिमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 25 सप्टेंबरला “अंत्योदय दिवस” पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरीब, दुर्बल, मागासलेल्या लोकांची उन्नतीसाठी कल्याणकारी कार्य या संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले. 26 सप्टेंबरला “जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात आले. याप्रसंगी समाजामध्ये पर्यावरण व मानवी जीवनातील आरोग्य या विषयावर चर्चा केली. 27 सप्टेंबरला “विश्व पर्यटन दिवस” या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ले व हिंदवी स्वराज्याची स्थापना, शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी चित्रफिती द्वारे माहिती देण्यात आली. 28 सप्टेंबरला शहीद भगतसिंग जयंती निमित्त त्यांचे कार्य, देशभक्ती, साहस या विषयी मान्यवरांनी सखोल माहिती दिली. 29 सप्टेंबरला “जागतिक/विश्व ह्रदय दिवस साजरा करण्यात आले. तसेच या आठवड्याचे समारोप करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर यांनी भूषवले आणि त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. गजानन जंगमवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. घोडेस्वार यांनी केले. प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांचे प्रत्येक कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. गौरकार, प्रा. डॉ. बन्सोड, प्रा. पेंदाम, प्रा. बंडावार, प्रा. डॉ. घोनमोडे, प्रा. तेलंग, प्रा. तुंडुलवार, डॉ. वाघ, प्रा. गर्गम आणि प्रा. काटकर यांनी कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, सचिव प्रशांतपोटदुखे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.



