गडचिरोलीविदर्भ

इंधन दरवाढ, धान खरेदी आणि ‘नीट’ पेपरफुटीविरोधात काँग्रेसची निदर्शने

आ. मसराम यांच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारकासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

देसाईगंज : केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रविवारी (दि.३१) देसाईगंज येथे काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक परिसरात पार पडलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदास मसराम यांनी केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकत्याच गाजलेल्या शैक्षणिक घोटाळ्यांवरून सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

आंदोलनादरम्यान मुख्यत्वे इंधन दरवाढ व टंचाई: सातत्याने वाढणारी इंधन दरवाढ रोखून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा आणि इंधनाची टंचाई तात्काळ दूर करावी. धान-मका खरेदी: स्थानिक शेतकऱ्यांच्या धान आणि मका खरेदीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करून, शेतकऱ्यांचे बरेच दिवस प्रलंबित असलेले चुकारे (पेमेंट) तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत. ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळा: देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांवर प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनात जिवन नाट, परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, प्रभाकर तुलावी, जयंत हरडे, नितीन राऊत, गिरीधर तितराम, दिलीप घोडाम, इलियास पठाण, प्रकाश समर्थ, गजानन सेलोटे, कैलास राणे, अरुण कुंभरवार, नरेंद्र गजपुरे, संजय करांनकर, नेताजी ठाकरे, डोमा दिवठे, गुलाब नंदेश्वर, रमाकांत भर्रे, अमर भर्रे, प्रांजल धाबेकर, सागर वाढई, कैलास वानखेडे, मनोहर खेकारे, कमलेश बारस्कर, सागर बन्सोड, होमराज हारगुडे, हंसराज लांडगे, हिरामण कुळमेथे, प्रकाश सांगोडे, मेघराज बुराडे, परशुराम ठाकरे, प्रमोद पत्रे, भूमेश्वर शिंगाडे, शैलेंद्र बगमारे, ऋषी बगमारे, व्यंकट पेंदाम, श्रीराम सोरते, महेंद्र खरकाटे, गजेंद्र नाईक, यशवंत जुमनाके, भावेश मुंगणकर, प्रशांत अंकमवार, मुन्ना शेख, कैलास बगमारे, जुबेर शेख, आक्रोश शेंडे, पवन गेडाम, पंकज चांहादे, मुजीब शेख, जगन पर्वते, राकेश निमकर, नेताजी बुराडे, श्रीहरी कन्नाके, सागर शेंडे, उमाकांत भर्रे, तेजराम नंदेश्वर, श्रीहरी ठाकरे, दिलीप कुळमेथे, हरिदास बगमारे, राजकुमार मेश्राम, शरीफ भाई, सुनील बुराडे, रियाजुल शेख, अजीम खान, जब्बार शेख, सादिक शेख, डोमाजी दिवटे, बंडू तांबे, अश्विन मुळे व देवानंद सहारे उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराशी निगडित असलेल्या महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सरकारला धारेवर धरले. यामध्ये प्रामुख्याने राणी शेख, गंधर्व मेश्राम, आर. एम. राऊत, अर्पणा राऊत, जयमाला पेंदाम, मंदा समर्थ, वैष्णवी आकरे, आशा झोडे, शालू नंदेश्वर, सुनीता चौधरी, सीमा टेंभुर्णे, सुशीला गजभिये, हाजरा शेख आणि सुरेखा ढोरे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button