गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणास वेग ; बीएलओकडून गणना पत्रक वाटप सुरू

गोंदिया : भारतीय निवडणूक आयोगाकडून 14 मे 2026 रोजी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष कामाला वेग आला असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत गणना पत्रकांचे वाटप सुरू झाले आहे.

या उपक्रमाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा असून प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देत असून त्यांना आवश्यक माहिती देत आहेत तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक आणि संबंधित गावांची यादी माध्यम प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आपल्या भागातील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधणे सुलभ होणार आहे.

प्रशासनाने सर्व नागरिकांना या पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले असून, आपली माहिती तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत करून घ्याव्यात, असेही सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button