गडचिरोलीविदर्भ

केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही धोरणा विरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

गडचिरोली : भारत हा सर्वोच्च लोकशाही माननारा देश म्हणून समजला जातो. मात्र मागील काही वर्षापासून देशातील राजकीय परिस्थिती पाहता देशातील वातावरन अत्यंत भयावह झाला आहे, स्वतः सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही मूल्यांना तळा घालण्याचे काम होत आहे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याकरिता सत्ताधार्यां बरोबरच विरोधकही तितकेच महत्वाचे आहे. मात्र वर्तमानात विविध दबाव तंत्र आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला,  युवक व इतर शोषितांच्या समस्यांना घेऊन लोकसभेत व सार्वजनिक ठिकाणी सतत आवाज उठवित आहेत. त्यामुळे घाबरलेल्या मोदी सरकारकडून काँग्रेस नेत्यासह इतर नेत्यांना वारंवार विविध प्रकणात खोटे आरोप लाऊन कुठेलेही तथ्य नसतांना नोटीस दिल्या जातात व त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांवर दबाव आणणाऱ्या कृत्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन सत्ताधाऱ्यांना लोकशाही मूल्य अबाधित राहण्याकरिता योग्य ते निर्देश व सूचना देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुभाष अडबाले, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक अ‍ॅड. सचिन नाईक,  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कोवासे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पंकज गुड्डेवार, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नितेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष सहकार सेल अब्दुल पंजवानी, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे, प्रभाकर वासेकर, जितेंद्र मुनघाटे, सुधीर बांबोळे, माजित सय्यद, भैय्याजी मुद्देमवार, नेताजी गावतुरे, चारुदत्त पोहाणे, परशुराम गेडाम, उत्तम ठाकरे, स्वप्निल बेहरे, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, घनश्याम मुरवतकर, काशिनाथ भडके, मिलिंद बारसागडे, आकाश मुलकलवार, राकेश रत्नावार, संजय मेश्राम, विनोद खंडारे, सुरेश भांडेकर, अविनाश श्रीरामवार, गौरव एनप्रेड्डीवार, अरुण  कुकुडकर, विठ्ठल काळे, जावेद खान, बांगे, अपर्णा खेवले, कविता उराडे, सुनीता रायपुरे, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button