गडचिरोलीविदर्भ

दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा २० मे रोजी शिवसेनेतर्फे सत्कार

गडचिरोली : केंद्रीय शिक्षण मंडळ (CBSE) आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या परीक्षेत जिल्ह्यातून ‘टॉप-५’ मध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ २० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अरविंद कात्रटवार यांच्या चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात होणार आहे.

या कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावीच्या सीबीएसई तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिल्या पाच क्रमांकात आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यादव लोहंबरे यांनी जिल्ह्यातील टॉप-५ मध्ये आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना या सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सत्कारासाठी निवड झालेले गुणवंत विद्यार्थी :

वर्ग १० वी (राज्य बोर्ड): १) आयुष सचिन ब्राम्हणवाडे – ९७.६०%, वसंत विद्यालय गडचिरोली २) समर मनोज खोबे – ९६%, गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली ३) धनश्री आलाम – ९५.८०%, शिवाजी अकॅडमी गडचिरोली ४) योगेश्वरी क्षिरसागर – ९३.६०%, वसंत विद्यालय गडचिरोली ५) वेदांत भंडारे – ९३.४०%, वसंत विद्यालय गडचिरोली

वर्ग १० वी (सीबीएसई): १) शौर्य सुधाकर रायपुरे – ९७.२०%, प्लॅटीनम ज्युबली स्कुल गडचिरोली २) सुष्मीत कौर सुलूजा – ९६.८०%, ग्लोबल मिडीया केरला स्कुल आलापल्ली ३) प्रणव भोंगळे – ९६.३३%, नवोदय विद्यालय घोट ४) अर्जुन मोडक – ९६.२०%, प्लॅटीनम ज्युबली स्कुल गडचिरोली ५) एंजल वाळके – ९५.८०%, कारमेल स्कुल गडचिरोली

वर्ग १२ वी (सीबीएसई): १) प्रांजन कुंभमवार – ९७.८३%, नवोदय विद्यालय घोट २) अनघा दिकोंडावार – ९५.५०%, नवोदय विद्यालय घोट ३) जानवी बुध्दे – ९२.६७%, नवोदय विद्यालय घोट ४) प्राची निकोडे – ९२.१७%, नवोदय विद्यालय घोट ५) फाल्गुनी सहारे – ९०.२०%, स्कुल ऑफ स्कॉलर गडचिरोली

वर्ग १२ वी (विज्ञान शाखा): १) शरयू विलास ढोरे – ९२%, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय देसाईगंज २) स्नेहांशू सुजीत सरकार – ९१.१७%, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय सुंदरनगर, मुलचेरा ३) संजना कालीदास पदा – ९०.६७%, शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली ४) जागृती जगदीश मेश्राम – ८९.८३%, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज गडचिरोली ५) प्रिन्स रविंद्र वडेट्टीवार – ८९.८३%, राजश्री शाहू महाराज स्कुल ऑफ सायन्स चामोर्शी

वर्ग १२ वी (कला शाखा): १) नेहा रमेश सोनटक्के – ८८.८३%, शिवाजी महाविद्यालय गडचिरोली २) खुशाल राउत – ८८%, शिवाजी महाविद्यालय गडचिरोली

वर्ग १२ वी (एमसीव्हीसी शाखा): १) मदीहानाज मेहबुबखॉन पठाण – ८५.६७%, शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली २) राहुल जीवनदास मुरतेली – ७९.५०%, सिंधुताई पोरेड्डीवार कॉलेज गोगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button